महाराष्ट्र आणि दिल्ली एकत्रित भरतात देशाचा निम्मा आयकर

SmartUp Team :  सर्वाधिक आयकर भरणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. एकटा महाराष्ट्र हा यादीत समाविष्ट असलेल्या चार राज्यांच्या एकूण आयकरापेक्षा जास्त कर भरतो. तर महाराष्ट्र आणि दिल्ली एकत्रित देशातील अर्धा आयकर भरतात. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने जारी केलेल्या आयकर आकड्यांमधून ही बाब समोर आली आहे.

यावरुन स्पष्ट समजतं की, ज्या राज्यात जास्त कंपन्या आहेत, तिथून सर्वाधिक कर जमा होतो. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये आयकर वसुलीत वाढीच्या दृष्टीने पूर्वोत्तर राज्यांनी उर्वरित भारतावर बाजी मारली आहे. याशिवाय आयकराबाबत इतरही अनेक रंजक गोष्टी समोर आल्या आहेत, त्यावर एक नजर टाकूया.

2017-18 मध्ये सर्वाधिक आयकर वसुली झालेली पाच राज्यं

महाराष्ट्र – 38.3%

दिल्ली – 13.7%

कर्नाटक – 10.1%

तामिळनाडू – 6.7%

गुजरात – 4.5%

आयकर वसुली वाढीच्या दृष्टीने सर्वात पुढे असलेली पूर्वोत्तर पाच राज्यं

मिझोराम – 41%

नागालँड – 32.1%

सिक्कीम – 26%

त्रिपुरा – 16.7%

मेघालय – 12.7%

एकूण महसुलात प्रत्यक्ष कराचं योगदान

2001-01 : 36.3%

2017-18 : 52.3%

ITR फाईल करणाऱ्याच्या संख्येत 65% वाढ

2013-14 : 3.3 कोटी

2017-18 : 5.2 कोटी

एकूण करदात्यांच्या संख्येत 60% वाढ

आर्थिक वर्ष 2013-14 : 88,649

आर्थिक वर्ष 2017-18 : 1,40,139

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *