एफआरपी अधिक दोनशे द्यावेच लागतील अन्यथा ऊसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही – खा राजू शेट्टी यांचा इशारा

SmartUp टीम : एकरक्कमी एफआरपी अधिक दोनशे रूपये कारखानदारांनी

द्यावेत  अन्यथा कारखान्यांना उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही. कारखानदार आणि शासन यांच्या बापाकडून शेतकऱ्याच्या घामाचे दाम

घेतल्याशिवाय गप बसणार नाही असा खणखणीत इशारा  खासदार राजू शेट्टी

यांनी जयसिंगपूर येथील  सतराव्या ऊस परिषदेत दिला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी दशरथ सावंत हे होते.

खा. शेट्टी म्हणाले,   जेंव्हा साखरेला ३६०० रुपयाच्या वर भाव होता़ त्यावेळी

कच्च्या साखरेचे भाव २३०० रूपये होते. ज्यांचे रिफायनरी उद्योग आहेत अशा

व्यापाऱ्यांनी साखरेचे भाव खाली पाडले.  संघटनेनी शासनाची दिशाभूल करुन कच्चीसाखर आयात केली. ती पक्की

करून इथेच विकली त्यामुळे त्याचे नुकसान मात्र शेतकऱ्याला सोसावे लागले.

कोल्हापूर विभागातील गेल्या हंगामातील ४६० कोटी रूपये येणे आहेत. ते

घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे.

ते पुढे म्हणाले, सरकारने आम्हाला काहीच दिलेले नाही. गेल्यावर्षीची

एफआरपी २५५० ही साडे नऊ टक्याला होती. आता दहा टक्याला २७०० रूपये केली

इथेच त्यांनी फसवणूक केली आहे.

रविकांत तुपकर म्हणाले, , सदाभाऊ खोत म्हणतात राजू शेट्टीनी सांगलीत उभारावे मी

हातकणंगलेत उभारतो. मुख्यमंत्र्यांनी सदाभाऊ खोत यांची उमेदवारी जाहिर

करायला हवी होती़ मात्र, सदाभाऊनांच लगीन करायची घाई झाली आहे. त्यांनी

स्वताचीच उमेदवारी जाहीर केली. खासदार बहुजनाचा झाला पाहीजे़ हे

आतापर्यंत नाही सुचलं, कोणत्या जातीत जन्माला यायचं हे आपल्या हातात

नाही. कतृर्त्वावर तुमचं मोठेपण ठरत असते. राजू शेट्टींनी कुठल्या

जातीसाठी, कुठल्या गटासाठी उसदर मागितला नाही.

पुजाताई मोरे,

रसिकाताई ढगे,माजी सभापती अनिल उर्फ सावकार मादनाईक, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हाध्यक्ष प्रा़डॉ़जालिंदर पाटील  प्रा़डॉ़प्रकाश पोपळे,

स्वाभिमानी पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष संदिप जगताप,  हंसराज वडगुले, स्वाभिमानी चे प्रदेश

उपाध्यक्ष सयाजी मोरे यांची भाषणे झाली़

ऊस परिषदेस खासदार

राजू शेट्टी यांच्या विजयाच्या घोषणा देत मोटरसायकल रॅली काढल्या़ ही

रॅली येथील मध्यवर्ती क्रांती चौकात आल्यानंतर येथून ऊस परिषदेच्या

व्यासपीठापर्यंत फुलांनी सजविलेल्या मार्गावरुन खासदार राजू

शेट्टी यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़

कोल्हापूर-सांगली महामार्गावर तसेच मैदानासमोरील नगरपरिषदेच्या इमारतीवर,

रस्त्यावर तसेच लगतच्या भाजी मंडईतसुध्दा लोकांनी गर्दी करुन मिळेल त्या

जागेवर थांबून ऊस परिषदेचा आस्वाद घेतला़ खासदार राजू शेट्टी यांच्या

समवेत सामुहिक शपथ ग्रहण केल्यानंतर आभार प्रदर्शनाने ऊस परिषदेची सांगता

झाली़

यावेळी अखिल

भारतीय किसान संघर्ष समितीचे समन्वयक व्ही.एम.सिंग, प्रदेशाध्यक्ष प्रा.

डॉ. प्रकाश पोपळे, वस्त्रोद्योगचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, सावकर

मादनाईक, प्रा. जालिंदर पाटील, भगवान काटे, संदीप जगताप, पुष्पाताई मोरे,

रसिकाताई ढगे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *