विराटला संगकाराचा विक्रम नाही आला मोडता

SmartUp टीम : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुध्दच्या एकदिवसीय मालिकेत धमाकेदार फलंदाजी करत शतकांचा रतीबच घातला होता. त्याने पहिल्या तीन सामन्यात सलग तीन शतके ठोकत शतकांची हॅटट्रिक केली. भारताकडून अशी कामगिरी करणारा विराट हा एकमेव फलंदाज आहे. पण, या विश्वविक्रम नाही सलग चार शतक करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. विराटचा सध्याचा फॉर्म पाहता विराट हा विश्वविक्रम मोडेल अशी चाहत्यांना आशा होती. पण, असे काही झाले नाही आणि संगकारा विराटच्या पुढेच राहिला.

विंडीज विरुध्दच्या चौथ्या सामन्यात भारताला ७१ धावांची सलामी दिल्यानंतर शिखर ३८ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार आणि शतकांची हटट्रिक करणारा विराट कोहली मैदानावर आला. पहिल्या तीन सामन्याप्रमाणे याही सामन्यात विराट शतक करुन संगकाराच्या सलग चार शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करेल अशी आशा विराटचे चाहते करत होते. पण, विराट १६ धावांवर पोहचला असताना रोचचा आत येणाऱ्या एका चेंडूवर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात बॅटची कडा लागली, किपर होपने झेल पकडला आणि  सर्व स्टेडियम स्तब्ध झाले, चाहत्यांच्या अशांवर पाणी फेरले.

विराट बाद झाल्याने भारताला एक मोठा धक्का बसला आहे. कारण या दौऱ्यात त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *