पार्थला सल्ला देणार नाही, ठेच लागली की तो शहाणा होईल – शरद पवार

ज्या नातवासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली त्याच नातवाबद्दल त्यांनी एक सूचक वक्तव्य केलंय. शरद पवारांचा तो नातू आहे मावळचा राष्ट्रवादीचा उमेदवार पार्थ पवार. मुलांना सल्ले देऊ नये, चालताना ठेच लागली की ते आपोआप शिकतात, शहाणे होतात असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय.

पार्थ हा अजित पवारांचा मुलगा. राष्ट्रवादीने त्यांना मावळमधून उमेदवारी दिली. एकाच घराण्यातल्या किती जणांनी उभं राहायचं असं म्हणत पवारांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे पार्थ पवार यांच्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली.

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी मावळमध्ये सभा घेतली होती. त्या सभेला अजित पवारही उपस्थित होते. त्या सभेत पार्थ यांनी पहिल्यांदाच तीन मिनिटे भाषण केलं. मात्र आजोबा आणि बाबांसमोर बोलताना ते अडखळले. विदेशात शिकल्यामुळे बोलताना त्यांचे मराठी उच्चारही वेगळे वटत होते. त्यात आजोबा आणि बाबांचं दडपण.

त्यामुळे पार्थ पवारांच्या त्या भाषणाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली  गेली. लोकसभेसाठी उभं राहणाऱ्या उमेदवाराला साधं भाषण करता येऊ नये का असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर पार्थ यांनी स्पष्टिकरणही दिलं होतं. माझी भाषणाची ही पहिलीच वेळ असल्यामुळे भाषण जमलं नाही. मात्र आता भाषण नाही तर काम करून दाखवणार असं पार्थ यांनी स्पष्ट केलं.

, , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *