संजय शिंदेंचा राष्ट्रवादीत प्रवेश आणि दुसऱ्याचंं मिनिटाला पवारांनी दिली उमेदवारी

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. डॅमेजकंट्रोल रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातूनराष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की ओढवल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारीही जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नुकतीच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.

कोण आहेत संजय शिंदे?

संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू आहेत.

माढा तालुक्यातील निमगाव येथील सरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरवात केली आहे.

१९९९ मध्ये संजय शिंदे कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले होते.

२०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

त्यांनी अपक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. भाजपसह इतर सहयोगी पक्षाचा शिंदेंना पाठिंबा आहे.

विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याचे शिंदे संस्थापक चेअरमन असून विठ्ठल सुतगिरनीचे ते अध्यक्ष आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिंदे संचालक आहेत.

माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आहेत.

, , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *