सभी नटो का एक ही पाणा नवनीत राणा सोशल मीडियावर ट्रोल

अमरावती | लोकसभा मतदारसंघात पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा ह्या पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात असून या मतदारसंघात एकच महिला उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहे. नवनीत राणा यांना शुक्रवारी निवडणूक विभागाने “पाना” हे निवडणूक चिन्ह दिले असून त्यांचा या चिन्हांची सोशल मीडियावर धूम सुरू आहे. सभी नटो का पाना नवनीत राणा हे घोषवाक्यच राणांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले असून नवनीत राणा सध्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या आहेत.

गत लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता. मात्र पराभवा नंतरही नवनीत राणा यांनी खचून न जाता आपला मतदारांशी संपर्क त्यांनी कायम ठेवला. अंतिम मतदारांन पर्यंत नवनीत राणा ह्या पोहचल्या आहे. नवनीत राणा यांनी अमरावती जिल्हा पिंजून काढत सामाजिक कार्य वर्षभर सुरूच ठेवले. हळदी कुंकूच्या मेळाव्याला त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. देशात नौकरी प्रमाणे राजकारणातही ५० टक्के आरक्षण असून अमरावती मतदारसंघात एकमेव नवनीत राणा ह्या महिला उमेदवार आहे. त्यामुळे महिला मध्ये आकर्षक नवनीत राणा ठरत आहे. एक महिला म्हणून पुरुषाप्रमाणे त्या रोज सकाळी प्रचाराला जाम फिरत आहे.

शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेत हा वाद अडसूळ यांनी न्यायालयात नेला होता. मात्र न्यायालयाने राणा यांना दिलासा दिला. त्यामुळे आनंदराव अडसूळ व नवनीत राणा यांचा वाद पाचही वर्ष चर्चेत राहिला. तरीही नवनीत राणा यांनी न डगमगता निवडणूक रिंगणात ताकतीने उभ्या आहेत. नवनीत राणा “टीव्ही” हे चिन्ह अपेक्षित असतांना त्यांना येन वेळी “टीव्ही” चिन्ह निवडणूक विभागाने नाकारत “पाणा” हे चिन्ह दिले त्यामुळे राणा कार्यकर्त्यांनी या पाना चिन्हांचा गाजावाजा करत सभी नटो का एकी पाना निवडुन आणा नवनीत राणा हे घोषवाक्य केले आहे. हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर राणा चर्चेत आल्या मात्र मतदारांच्या मनात नेमके काय हे मतमोजणी अंती कळेल.

, , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *