वनडेत विराटच नंबर वन, कुलदीपचीही मोठी झेप

SmartUp टीम :  इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी केल्याने विराट कोहलीचे आयसीसी वनडे क्रमवारीतील अव्वल स्थान आणखी मजबूत झाले आहे. तर भारताचा युवा फिरकीपटू कुलदीप यादवलाही पहिल्यांदाच ‘टॉप टेन’ गोलंदाजांत स्थान मिळवण्यात यश आलं आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत विराटच्या नावावर 911 गुण आहेत. विराटच्या वनडे कारकिर्दीतील ही आत्तापर्यंतची सर्वाधिक चांगली कामगिरी आहे.

इंग्लंडला आपल्या फिरकीवर नाचवणारा भारताचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीपने वनडे गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. कुलदीपच्या नावावर 684 गुण जमा आहेत.

दुसरीकडे, इंग्लंडचा जो रुट फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या नावावर 818 गुण आहेत. भारताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेत शतकी खेळी करुन जो रुटने इंग्लंच्या संघाला विजय मिळवून दिला होता.

गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान पहिल्या क्रमांकावर आहे. फिरकीपटू राशिदच्या नावावर 763 गुण आहेत.

टॉप 10 फलंदाज

विराट कोहली

जो रूट

बाबर आजम

रोहित शर्मा

डेविड वॉर्नर

रॉस टेलर

क्विंटन डिकॉक

फाफ डुप्लेसी

केन विलियमसन

शिखर धवन

टॉप 10 गोलंदाज

जसप्रीत बूमराह

राशीद खान

हसन आली

ट्रेट बोल्ट

जॉश हेजलवूड

कुलदीप यादव

इमरान ताहिर

आदिल रशीद

कगिसो रबाडा

यजुवेंद्र चहल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *