हाडांच्या बळकटीसाठी हे करा

SmartUp टीम : हाडांचे आरोग्य राखणे, हेही थोडे-फार म्हणण्यापेक्षा बरेच आपल्या हातात आहे.  शरीरातील हाडे ही आयुष्यभर निरोगी ठेवणे महत्त्वपूर्ण आहे. निरोगी हाडे शरीराला गतिशील ठेवतात व दुखापतींपासून संरक्षण देऊन बळकट आधार देतात. खरे तर, हाडे बळकट ठेवण्याचे सर्वांत महत्त्वाचे काम हे कॅल्शियम करतात. त्यामुळे कॅल्शियम हे खनिज आपल्या शरीरात जाणे महत्त्वाचे. त्यासाठी योग्य तो आहार रोजच्या जेवणात ठेवावा.

योग्य पोषण आहार आणि व्यायामाद्वारे हाडांची काळजी घेतल्यास हाडांचा बळकटपणा राखला जाऊन आपल्याला पाहिजे असलेल्या पद्धतीने जीवन जगण्यास मदत मिळते.  म्हणून, लहान मुलांना आहारा देताना त्यात सर्व पोषण आहार असलेले घटक असावेत. काही दक्ष आणि जागरुक माता मुलांना आहार देताना पालेभाज्या, सॅलड, कोशिंबीर, शेंगदाण्याचा कूट असलेले पदार्थ अशा प्रकारांनी ताट सजवूनच खायला लावतात.

हाडांचे आरोग्य बिघडण्याचा धोका थोडे तरुण वयानंतर मध्यम वयामध्ये होऊ शकतो. त्याच बरोबर महिलांमध्ये मणक्याच्या आणि कंबरेच्या आजाराचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार, आहारामध्ये नियमित सॅलड, पालेभाज्या, सूप याचा वापर करायला हवा. अंडी, मासे, हाडांचे सूप हेही हाडांच्या आजारावर अतिशय उपयोगी आहार आहेत. याच बरोबर किमान एक चमचा तरी तूप पोटात जायला हवे. आहाराबरोबरच तुमची झोपण्याची पद्धतही चुकीची असेल तर हाडांचे आरोग्य बिघडण्यात रुपांतर होऊ शकते. मणक्याचा आजार असणार्‍यांनी उंचच उंच उशीचा वापर करू नये. मणक्याचे दुखणे जास्त असल्यास त्यांनी सरळ गादी आणि उशीचा उपयोग टाळावा आणि सरळ जमिनीवर सतरंजीवर झोपावे.  कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तास फिरणे एकदम फायदेशीर ठरते. बैठे प्रकारचे काम करणार्‍यांनाही मणक्याचे आजार लवकर जडतात, असे संशोधनाअंती दिसून आले आहे. त्यांनी तर फिरण्याचा व्यायाम हा नियमित केलाच पाहिजे. दिवसभर इतकी धावपळ आणि पळापळ करता; पण स्वत:च्या आरोग्यासाठी एक तासाची पळापळ फायदेशीर ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *