रितेश देशमुखचा ‘माऊली’ येणार ‘या’ दिवशी

SmartUp टीम : ‘लई भारी’नंतर अभिनेता निर्माता रितेश देशमुख ‘माऊली’ हा चित्रपट घेऊन येत आहे. ‘लई भारी’ चित्रपटात रितेश देशमुखने माऊली हे पात्र साकारलं होतं. आता त्‍याच नावाचं टायटल असणारा ‘माऊली’ हा चित्रपट येत आहे. रितशने या चित्रपटाबद्‍दलची माहिती ट्‍विटरवरून दिली आहे. ‘माऊली’ २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘माऊली’चा एक लूक याआधी रिलीज झाला होता. आता आणखी एक फोटो रितेशने शेअर केला आहे. रितेशने माऊलीचे एक पोस्‍टर पोस्‍ट केला आहे. या पोस्‍टरवर २१ डिसेंबर २०१८ असेही लिहिलेले दिसते.

याआधी रितेशचा हा ‘ब्लॅक अँड व्हाईट’ लुक रिविल करण्यात आला होता. रितेशचा तो फोटो अविनाश गोवारीकर यांनी कॅमेराबध्‍द केला होता.

 

1 thought on “रितेश देशमुखचा ‘माऊली’ येणार ‘या’ दिवशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *