हृतिक- कंगना पुन्हा एकदा आमने सामने

SmartUp टीम :  अभिनेता हृतिक रोशन आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हे दोघे पुन्हा एकदा समोरसमोर उभे ठाकले आहेत. कंगना रनौतचा बहुचर्चित ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपट तर हृतिकचा ‘सुपर30’ हा चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत. हे दोन्ही चित्रपट 25 जानेवारी 2019 ला रिलीज होणार आहेत.

हृतिकच्या ‘सुपर30’ या चित्रपटाची रिलीज डेट यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. पण शनिवारी ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ चे निर्माते कमल जैन यांनी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली. आता बॉक्स ऑफिसवर या दोघांचे चित्रपट एकमेकांशी कसे टक्कर देतात हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘सुपर 30’ मध्ये हृतिक गणितज्ञ आनंद कुमारच्या भूमिकेत दिसेल. ‘सुपर 30’ हा चित्रपट या वर्षी रिलीज केला जाणार होता पण काही कारणास्तव चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता ‘सुपर 30’  चित्रपट 25 जानेवारी 2019 ला रिलीज होणार आहे.

मणिकर्णिका या चित्रपटात कंगना रनौत झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात सोनू सूद, अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडे सुद्धा झळकळार आहेत. निर्माते कमल जैन यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *