मी त्याला रंगेहाथ पकडले होते…! दीपिकाने सांगितले ‘त्या’ ब्रेकअपमागचे कारण!!

SmartUp टीम : कधी काळी बॉलिवूडच्या सर्वांत सुंदर कपलमध्ये गणल्या जाणाऱ्या रणबीर कपूर व दीपिका पादुकोण यांचे मार्ग कधीचेच वेगळे झालेत. काही वर्षांपूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले़ या ब्रेकअपनंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली. यातून बाहेर पडण्यासाठी तिला बरेच प्रयत्न करावे लागलेत. या ब्रेकअपसाठी कोण जबाबदार होते, हे कधीच समोर आले नव्हते. पण ताज्या मुलाखतीत दीपिकाने आपली चुप्पी तोडली आणि या ब्रेकअपमागची कहाणी जगासमोर आली. अर्थात हे करताना रणबीर कपूरचे नाव घेणे तिने टाळले. त्याचा नामोल्लेख न करता, तिने जे सांगायचे ते सांगितले.

 

‘मी त्याला रंगेहात पकडले होते. त्याच क्षणाला सगळ्या भावना विसरून मी त्याच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला,’ असे दीपिकाने या मुलाखतीत सांगितले. ती म्हणाली, ‘माझ्यासाठी प्रेमाचा अर्थ केवळ शारीरिक गरजांपुरता मर्यादीत नाही. कुणाच्या प्रेमात पडणे, याचा अर्थ त्याच्या भाव-भावनांशी एकरूप होणे, असे मी मानते. अर्थात हे माझे विचार आहेत. सर्वजण हाच विचार करतील, हे गरजेचे नाही. त्याकाळात मी रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा, तो तुला धोका देतोय, असे अनेकांनी मला सांगितले होते. मलाही हे माहित होते. पण तो माझ्यासमोर प्रेमाची भीक मागत, रडला होता़ त्यामुळे मी त्याला दुसरी संधी दिली. पण यानंतरही एक दिवस मी त्याला रंगेहात पकडले. त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना मी त्याला कधीच धोका दिला नाही. कारण असे करायचे तर त्यापेक्षा मी सिंगल राहीन.’
पुढे ती म्हणाली, ‘त्याने मला पहिल्यांदा फसवले, तेव्हाच या नात्याला काहीही भविष्य नाही, हे मला जाणवले होते. धोका देणे, फसवणे हा एखाद्या व्यक्तिचा स्वभावचं असेल तर तुम्ही सगळे देऊनही त्या नात्यात हरताचं. मी त्या नात्यात सगळे काही दिले़ याबदल्यात कधीच कुठली अपेक्षा केली नाही. पण विश्वास तुटल्यानंतर मी तुटले. ब्रेकअपनंतर मी कित्येक दिवस रडत राहिले. वेळ आल्यानंतर त्यातून बाहेर पडले व पुढे निघाले.’

तुम्हाला ठाऊक असेलचं की, दीपिका व रणबीर कपूर २००७ मध्ये ‘बचना ऐ हसीनों’च्या सेटवर एकमेकांच्या जवळ आले होते. रणबीरच्या प्रेमात पडल्यानंतर दीपिकाने त्याच्या नावाचा टॅटूही गोंदवला होता. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कॅटरिना कैफच्या प्रेमात पडला. पण तिच्यासोबतही त्याचे ब्रेकअप झाले. सध्या तो आलिया भट्टच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. अनेकप्रसंगी त्याने अप्रत्यक्षपणे याची कबुली दिली आहे. दीपिकाचे म्हणाल तर ती सध्या रणवीर सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच रणवीर व दीपिका लग्न करणार असल्याची खबर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *