इन्स्टाग्रामवर कोहलीची ‘विराट’ कमाई; कोहली एकमेव क्रिकेटपटू

SmartUp टीम : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसमोर सध्या इंग्लंडमध्ये खेळण्याचे आव्हान आहे. एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आपली कामगिरी आणखी उंचावण्यासाठी कोहली धडपडत आहे. कोहलीची सोशल मीडियावर कमाई मात्र विराट आहे. सोशल मीडियावर वाढत्या लोकप्रियतेमुळे इन्स्टाग्रामने त्याचा नावाचा समावेश सर्वात श्रीमंत १० इन्स्टाग्राम अकांउटमध्ये केला आहे.

इन्स्टाग्रामने आज सर्वात श्रीमंत अकाउंटची यादी जाहीर केली. यामध्ये कोहली ९वा असा खेळाडू आहे जो आपल्या स्पॉन्सर्ड पोस्टसाठी सर्वाधिक पैसे घेऊ शकतो. विराटचे इन्स्टाग्रामवर २ कोटी ३० लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तो एका पोस्टसाठी एखाद्या कंपनीकडून ८२लाख रुपयांची मागणी करु शकतो.

सर्वात श्रीमंत १० इन्स्टाग्राम अकाउंटच्या यादीत फुटबॉलपटू आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो  आघाडीवर आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर १३ कोटी फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर श्रीमंतांच्या या यादीत त्याच्यानंतर नेमार, मेस्सी, डेव्हिड बेकहॅम, गॅरेथ बेल, झल्तान इब्राहिमोविक हे स्टार फुटबॉल खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंमध्ये विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे.

कोहलीच्या नावाचा या यादीत समावेश असल्याने क्रिकेट जगतातील इतर खेळांच्या तुलनेतही विराट अशीच असल्याचे दिसते. याअगोदर विरोट कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटला सर्वात बिझी अकाउंटचा अवॉर्ड देण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *