2018 च्या फिफा विश्वचषकातले टॉप टेन गोल्स पाहिलेत का?

SmartUp टीम :  यंदाचा रशियातला फिफा विश्वचषक फुटबॉल चाहत्यांसाठी अनोखी पर्वणी ठरला. 32 दिवस चाललेल्या फुटबॉलच्या या महामेळ्यात 64 सामन्यांमध्ये तब्बल 169 गोल डागले गेले. या 169 गोल्समधून फिफानं सर्वोत्तम दहा गोलची निवड केली आहे.

फिफानं निवडलेल्या या टॉप टेन गोल्समध्ये विश्वविजेत्या फ्रान्सच्या बेंजामिन पॅवार्डच्या गोलची स्पर्धेतला सर्वोत्तम गोल म्हणून नोंद झाली आहे. पॅवार्डनं उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध हा गोल नोंदवला होता. सामन्याच्या 57व्या मिनिटाला पॅवार्डनं डागलेल्या गोलमुळे फ्रान्सनं 2-2 अशी बरोबरी साधली होती. आणि त्यानंतर तो सामनाही 4-3 असा जिंकला होता. त्यात पॅवार्डचा हा गोल निर्णायक ठरला होता. त्यामुळे फिफानं पॅवार्डच्या या गोलची विश्वचषकातला सर्वोत्तम गोल म्हणून निवड केली.

सर्वोत्तम गोलच्या या शर्यतीत कोलंबियाच्या युआन क्वान्टेरोच्या गोलला दुसरं तर क्रोएशियाच्या ल्युका मॉड्रिचनं झळकावलेल्या गोलला तिसरं स्थान मिळालं.

2018 च्या फिफा विश्वचषकातले टॉप टेन गोल्स

1) बेंजामिन पॅवार्ड (फ्रान्स) वि. अर्जेंटिना

2) युआन क्वान्टेरो (कोलंबिया)  वि. जपान

3) ल्युका मॉडरिच (क्रोएशिया) वि. अर्जेंटिना

4) ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) वि. स्पेन.

5) लायनल मेसी (अर्जेंटिना) वि. नायजेरिया

6) डेनिस चेरिशेव्ह (रशिया) वि. क्रोएशिया

7) नासर चॅडली (बेल्जियम) वि. जपान

8) अहमद मुसा (नायजेरिया) वि. आईसलँड

9) रिकार्डो क्वारेझ्मा (पोर्तुगाल) वि. इराण

10) टोनी क्रूझ (जर्मनी)  वि. स्वीडन

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *