मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री

SmartUp टीम : गेल्या दोन आठवड्यापासून पेटलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सकल मराठा समाज आंदोलकांसोबत सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सहमती दर्शवली. पण पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अभय दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सुरक्षेच्या कारणास्तव बैठकीला उपस्थित असलेल्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. पत्रकार परिषदेला राज्यसभा खासदार नारायण राणे उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेले मराठा आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने काल विधानसभेमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा केली होती.

काय म्हणाले मुख्यमंत्री…..

-मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक
– पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही
– मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील
– मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल आल्यानंतर तत्काळ निर्णय घेतला जाईल
– मेगा भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही
– सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी तयार
– सर्व संघटनांनाकडून सहकार्याची अपेक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *