जान्‍हवी कपूरला मिळाला दुसरा चित्रपट

SmartUp टीम : ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्‍यू करणार्‍या जान्‍हवी कपूरच्‍या झोळीत दुसरा चित्रपट पडला आहे. ‘धडक’ काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. या चित्रपटात जान्‍हवी सोबत ईशान खट्‍टरची प्रमुख भूमिका होती. याआधी ईशानने माजिदी माजिद यांचा ‘बियॉन्‍ड द क्लाउड्स’ केला हातेा. परंतु, धडक हा जान्‍हवीचा पहिलाच चित्रपट होता.

‘धडक’ने आतापर्यंत ६४ कोटींचा गल्‍ला जमवला आहे. त्‍यातील गाणीही प्रसिध्‍द झाली आहेत.

Jhanvi-kapoor

आता जान्‍हवीला आणखी एक चित्रपट मिळालाय. मीडिया रिपोर्टनुसार, आगामी चित्रपटात जान्‍हवी वरुण धवनसोबत रोमान्‍स करताना दिसणार आहे. ‘रणभूमी’ असं चित्रपटाचं नाव असल्‍याचं म्‍हटलं जात आहे. हा चित्रपट शशांक खैतान बनवत आहेत.

वरुण पहिल्‍यांदाच जाहन्वीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. करण जोहरच्‍या धर्मा प्रोड्क्शन बॅनरखाली ‘रणभूमी’ची निर्मिती होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *