हात जोडून विनंती करतो आरक्षण द्या, नाहीतर अनर्थ होईल: उदयनराजे भोसले

SmartUp टीम : मराठा आरक्षणासंदर्भात पुण्यात झालेल्या समन्वयकांच्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले पत्रकार परिषदेत बोलत आहेत. पुण्यातील प्रेसिडेन्सी क्लबमधे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयकांनी बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला इशारा दिला. आरक्षणासंदर्भात ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल असे उदयनराजे यांनी सांगितले. तसेच गेल्या 30 वर्षांपासून यावर केवळ चर्चाच होत आहे. या प्रश्न इतका चिघळण्यासाठी माजी-आजी सरकार जबाबदार असल्याचे उदयनराजे म्हणाले.

काय म्हणाले उदयनराजे… 

मराठा आरक्षण लवकर तोडगा काढणे गरजेचे
आरक्षणाचा निर्णय लवकरच होईल; आत्महत्या, तोडफोड करू नका
आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे मराठा आरक्षणप्रश्न चिघळला
समन्वयकांच्या सूचनांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवणार
मुलभूत अधिकारांसाठी लोकांना भिकाऱ्यासारखी फिरण्याची वेळ आली
सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत अनेकांचे बळी गेले
लोकांनी रस्त्यावर यायला सरकारच जबाबदार
वेळीच आरक्षण दिले असते तर आयोगाची गरजच नव्हती
आरक्षणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा
आरक्षणासाठी जो स्वत:चा जीव देऊ शकतो, तो दुसऱ्याचा जीव घेऊ देखील शकतो
आरक्षणासंदर्भात ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल
हात जोडून विनंती करतो आरक्षण द्या, नाहीतर अनर्थ होईल
आरक्षणाच्या मुद्यावर सरकार किती दिवस मौन बाळगणार
शिवाजी महाराज सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी लढले
महाराजांचे नाव घेणाऱ्यांनो, त्यांचे विचारही रुजवा
मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका
कायद्याचे नाव पुढे करून आरक्षण रखडवू नका
आरक्षणावर गेल्या 30 वर्षापासून केवळ चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *